Do Not Search These 5 Things on Google; गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/do-not-search-these-5-things-on-google-you-may-land-in-jail-and-10-lakh-fine/articleshow/99110120.cms

Do Not Search These on Google: टाइमपास म्हणून तुम्ही जर गुगलवर काहीही सर्च करायच्या भानगडीत पडलात तर तुमची काही खैर नाही. कारण, काही गोष्टी गुगलवर सर्च करणे म्हणजेच जेलची हवा खायला लावणारा मार्ग आहे. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर राहा. अलर्ट राहा. जाणून घ्या.

Do Not Search On Google

नवी दिल्लीः गुगलचा वापर सर्वच जण करतात. गुगलवर काहीही सर्च केल्यास त्याची माहिती मिळते. त्यामुळे अनेक जण गुगलवर काहीही सर्च करीत असतात. परंतु, गुगलवर काही गोष्टी सर्च करणे चांगलेच महागात पडू शकते. कारण, असे काही टॉपिक्स आहेत. जे गुगलवर सर्च करणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि जेलची शिक्षा सुद्धा होवू शकते. जाणून घ्या या संबंधी.

१. गुगलवर कधीच गर्भपात कसा केला जातो. असं सर्च करू नका. हे कायद्याने बेकायदेशीर आहे. यासाठी सरकारने कायदा केलेला आहे. जर तुम्ही यासंबंधी काही सर्च करीत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.

वाचाः iPhone 14 Pro Max ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, Flipkart ऐवजी या ठिकाणाहून खरेदी करा

२. जर तुम्ही छोट्या मुलासंबंधी काही अश्लील कंटेंट सर्च करायच्या भानगडीत पडलात तर तुमची थेट रवानगी जेलमध्ये होवू शकते. तसेच तुम्हाला दंड सुद्धा लावला जावू शकतो. POSCO अॅक्ट अंतर्गत तुम्हाला कंटेंट सर्च करण्यासाठी ५ ते ७ वर्षाची शिक्षा होवू शकते.

३. जर तुम्ही गुगलवर बॉम्ब कसा बनवला जातो, यासंबंधी सर्च केले तर तुमचे दिवस फिरलेच म्हणून समजा. कारण, हे सुद्धा कायद्याने बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला कायद्याने शिक्षा होवू शकते.

वाचाः ७ दिवसात घरी पोहोचेल PAN Card, कुठेही जाण्याची गरज नाही, घरी बसून करा अर्ज

४. जर तुम्ही गुगलवर पायरेटेड मूव्हीच सर्च करीत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. यात तुम्हाला ३ वर्षाची जेल होवू शकते. तसेच १० लाख रुपयाचा दंड सुद्धा होवू शकतो.

५. समाजात वावरताना अशा काही संवेदनशील घटना असतात. त्या गुगलवर सर्च करीत बसल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. कोणत्याही पीडित व्यक्तीचे गुगलवर सर्च करू नका. यामुळे तुम्ही अडचणीत येवू शकता.

वाचाः मोठ्या डिस्काउंट सोबत iPhone 11 ला खरेदीची संधी, पाहा ऑफर्स डिटेल्स

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s