आरोग्य विमा खरेदी करताना निष्काळजीपणा नकोच; या ३ मार्गांनी वाढवा विमा संरक्षण – Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/increase-your-health-insurance-coverage-limit-by-3-ways/articleshow/87455866.cms?utm_source=briefs

वैद्यकीय विमा तज्ञ देखील शिफारस करतात की कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र पॉलिसी घेण्यापेक्षा फॅमिली फ्लोटर हेल्थ कव्हरेज घेणे चांगले आहे. तुम्हाला वाटत असेल की, तुमचे वैद्यकीय कव्हरेज पुरेसे नाही, तर तुम्ही तीन प्रकारे ते वाढवू शकता.

आरोग्य विमा खरेदी करताना निष्काळजीपणा नकोच; या ३ मार्गांनी वाढवा विमा संरक्षणआरोग्य विमा खरेदी करताना निष्काळजीपणा नकोच; या ३ मार्गांनी वाढवा विमा संरक्षण

हायलाइट्स:

  • आपत्कालीन परिस्थितीत तुमचे संरक्षण करतो. तुम्ही घेतलेल्या विम्याचे वैद्यकीय कव्हरेज पुरेसे आहे की नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे.
  • जर ते कमी वाटत असेल, तर ते वाढवणे आवश्यक आहे.
  • तुमचे वैद्यकीय कव्हरेज पुरेसे नाही, तर तुम्ही तीन प्रकारे ते वाढवू शकता.

मुंबई : कोरोना महामारीच्या तडाख्यानंतर आरोग्य विमा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा झाला आहे. जर तुमच्याकडे वैद्यकीय विमा असेल, तर तो आपत्कालीन परिस्थितीत तुमचे संरक्षण करतो. तुम्ही घेतलेल्या विम्याचे वैद्यकीय कव्हरेज पुरेसे आहे की नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. जर ते कमी वाटत असेल, तर ते वाढवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे वैद्यकीय कव्हरेज पुरेसे नाही, तर तुम्ही तीन प्रकारे ते वाढवू शकता.

मुहूर्ताला सोनं खरेदी! धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव
जेव्हा तुमचा वैद्यकीय विमा नूतनीकरण केला जाईल, तेव्हा प्रत्येक विमा कंपनी तुम्हाला विम्याची रक्कम वाढवण्याचा पर्याय देते. जेव्हा विम्याचे नूतनीकरण केले जाते, तेव्हा त्या विम्याची रक्कम वाढवता येते. याचा फायदा म्हणजे प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) तुम्हाला लागू होत नाही. तुम्ही नवीन पॉलिसीवर स्विच केल्यास, दीर्घकालीन आजारासाठी चार वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असतो.

बेस कव्हरेज संपल्यानंतर मिळेल लाभ
हॉस्पिटलायझेशन खर्चापेक्षा कव्हरेज कमी पडत असल्यास, तुम्ही सुपर टॉप-अप योजना खरेदी करू शकता. हे तुमच्या हेल्थ कव्हरेजवर अतिरिक्त संरक्षण देते. तुमच्या बेस हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीइतकेच सुपर टॉप-अप प्लॅनमध्ये वजावट मिळते. तुमच्या बेस पॉलिसीचे कव्हरेज संपल्यावर ते वापरले जाऊ शकते. विमा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विमा कंपनीकडून सुपर टॉप-अप योजना खरेदी करणे चांगले आहे. अशा स्थितीत रुग्णालयाला विमा कंपनीशी संपर्क साधणे सोपे जाते.

छोट्या व्यावसायिकांना सहज मिळेल कर्ज; जाणून घ्या पंजाब नॅशनल बँंकेची ‘ही’ योजना
सुपर टॉप-अप प्रीमियम स्वस्त
सुपर टॉप-अप प्लॅन पूर्वी आणि नंतर हॉस्पिटलायझेशन हे दोन्ही कव्हर करतो. याशिवाय त्यात पूर्व परिस्थिती (प्री-एग्जिसिटंग) आणि बालसंगोपन उपचार (चाईल्ड केअर) देखील समाविष्ट आहेत. वैयक्तिक पॉलिसी स्वतंत्रपणे खरेदी करण्यापेक्षा सुपर टॉप-अप योजना खूपच स्वस्त आहे.

दिवाळीची सुट्टी ; राज्यात इतके दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या तपशील
फॅमिली फ्लोटरमध्ये मिळतो अधिक कव्हरेजचा लाभ
वैद्यकीय विमा तज्ज्ञ शिफारस करतात की, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र पॉलिसी घेण्यापेक्षा फॅमिली फ्लोटर हेल्थ कव्हरेज घेणे चांगले आहे. यामध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याला रुग्णालयात दाखल केल्यास त्याला अधिक कव्हरेजचा लाभ मिळतो. त्याचा प्रीमियम देखील सिंगल आहे. जर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य वयस्कर असतील आणि त्यांचा वारंवार दवाखान होत असेल, तर अशा प्रकरणांमध्ये वैयक्तिक पॉलिसी अधिक चांगली मानली जाते. तुम्ही फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतल्यास कुटुंबातील सर्वात मोठ्या व्यक्तीच्या वयाच्या आधारे प्रीमियमची गणना केली जाते. कुटुंबात तरुणांची संख्या जास्त असेल, तर प्रीमियममध्ये फायदा होतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s