लढवय्यी कार्यकर्ती : अनिता पगारे – महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/tribute-to-senior-progressive-thinker-social-activist-anita-pagare/articleshow/81751400.cms

महिलांच्या प्रश्नी सक्रिय राहतानाच वंचित, शोषितांचा आवाज बनलेल्या व परिवर्तनवादी चळवळीत आकंठ बुडालेल्या पुरोगामी विचारांच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांच्या निधनाने चळवळीचे नुकसान झाले आहे.

महिलांच्या प्रश्नी सक्रिय राहतानाच वंचित, शोषितांचा आवाज बनलेल्या व परिवर्तनवादी चळवळीत आकंठ बुडालेल्या पुरोगामी विचारांच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांच्या निधनाने चळवळीचे नुकसान झाले आहे. करोनाने आणखी एक लढवय्यी कार्यकर्ती हिरावून घेतली, एवढ्यापुरतेच हे दु:ख नाही. समाजकार्याचा व्यापक पैस असलेली झुंजार, लढवय्यी; पण कोणाशीही शत्रुत्व नसलेली, परिस्थितीला बोल न लावता त्याला सन्मुख जाणारी हसतमुख कार्यकर्ती समाजातून गेल्याची सल मोठी आहे. वंचितांचा लढ्याबरोबर तरुण पिढीतही तेवढ्याच तन्मयतेने समरस होऊन, ‘मैत्रकारवा‘ या उपक्रमाने वाढती गुन्हेगारी, प्रेम, नातेसंबंध अशा विषयांवरही त्यांनी काम केले. नाशिकच्या फुलेनगर वस्तीत जन्मलेल्या, अनिता यांनी प्रामाणिक समाजकार्याच्या माध्यमातून आंबेडकर व महात्मा फुले यांच्या सम्यक विचारांच्या खऱ्या वारसदार म्हणून ऐन तारुण्यातच लौकिक मिळविला. सतत कार्यमग्न राहणाऱ्या अनिता यांनी महिला हक्क संरक्षण समिती, टाटा सामाजिक संस्था, मुंबईचा फूड बाजार, जव्हारची आवेदन व नाशिकची विश्वास प्रबोधिनी अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कामाचा व्याप प्रचंड वाढवून ठेवला होता. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनाला मदत व्हावी, म्हणून घरोघर फिरून निधी गोळा करण्याची भूमिकाही स्वत:हून शिरावर घेतली. राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, छात्रभारती, दक्षिणायन अशा चळवळींतही त्यांनी मनापासून मुशाफिरी केली; त्यामुळेच जातीय, वर्गीय व पक्षीय चौकटीबाहेर त्या राहू शकल्या. परिणामी सर्वच व्यासपीठांवर त्यांचा सहज संचार राहिला. प्रत्येकाला स्वत:चा अ‌वकाश असतो यावर ठाम विश्वास असल्याने, त्यांनी कधीही कसला दुराग्रह धरला नाही. सामाजिक कार्य करताना आलेले जिवंत अनुभव त्या वृत्तपत्रात शब्दबद्ध करीत. त्यातूनच, ‘वस्तीवरची पोरं’ ही लेखमाला आणि सोबतच ‘जेंडर गोष्टी’ हे अनुभवकथन गाजले. चळवळीत काम करताना अनेकदा कार्यकर्ते एकारलेले होतात; पण अनिता या मुळातील संवेदनशील स्वभावामुळे कायमच माणूस व माणुसकी जपणाऱ्या म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांच्या अकाली जाण्यामुळे वस्तीवरची पोरं पोरकी झाली!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s