भाज्या की, हलाहल! –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/pesticides-in-vegetables-report-by-national-bulk-handling-corporation/articleshow/81698414.cms

आपण रोज भाज्या खातो की विष, हा प्रश्न येथे कदाचित अनाठायी व अनाकलनीय वाटू शकेल. परंतु, नॅशनल बल्क हॅण्डलिंग कॉर्पोरेशन (एनबीएचसी) ‘प्रोकॉम’ या संस्थेच्या अहवालानेच हा सवाल करायला बाध्य केले आहे. रोजच्या आपल्या ताटात येणाऱ्या भाज्या या १५ ते २० टक्के दूषित वा कीटकनाशकयुक्त असल्याचा धक्कादायक निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. सरासरी २० नमुन्यांमध्ये ४१ ते १६६ प्रकारचे कीटकनाशके चाचणीत आढळले. याचा अर्थ आपण दररोज भाज्यांबरोबर विषही खात आहोत आणि आपल्याला त्याचे भान नाही. आपल्या शरीरात रोज किती प्रमाणात कीटकनाशकयुक्त फळे व भाज्या जातात, याचे मोजमाप करण्याची यंत्रणा अस्तित्वात नाही, हे मोठेच दुर्दैव. हरित क्रांतीच्या परिणामी कृषी उत्पादन वाढले खरे; मात्र या समृद्धीपाठोपाठ रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापराची अवदसाही आली. अन्नधान्य व भाजीपाल्याची गरज उत्पादनवाढीने पूर्ण झाली, पण पोषणमूल्य वाढले का हा कळीचा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. आखाती वा युरोपीय देश भाजीपाला व फळे आयात करताना त्यातील रासायनिक घटकांचे प्रमाण तावून सुलाखून घेतात. प्रमाण जास्त असेल, तर हा माल सरळ नाकारतात. हाच नाकारलेला माल आपल्याकडे मात्र सर्रास खपवला जातो. जिथे पिकते, तेथेच विष विकले जाण्याचे हे धक्कादायक वास्तव आहे. सरकारी यंत्रणांनीही आजवर याकडे सर्रास डोळेझाक केली. आधीची पिढी रेशनिंगचे धान्य खाऊन वाढली आणि आताची पिढी कीटकनाशके खाऊन वाढते आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. मुंबईत रेल्वेमार्गानजीक गटारीच्या सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जातो. गावोगावीही उत्पादन वाढ व चार ज्यादा पैशांसाठी कीटकनाशकांच्या माध्यमातून जनतेच्या जीवाशी खेळ केला जातो, हे सारे भयानक आहे. कीटकनाशकांचा कमीत कमी वापर होऊन विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होईल यासाठी आता सरकारी पातळीवरच तातडीने हालचाल व्हायला हवी. शेतकऱ्यांना विषमुक्त भाजीपाला पिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळविण्याची गरज आहे. समाधानाची बाब म्हणजे भारतीय ग्राहकही अलीकडे चोखंदळ झाल्याने, तो सेंद्रिय उत्पादनांकडे वळू लागला आहे. आपण काय पिकवतो आणि काय खातो, याबाबत जागृती झाली, तरच आपल्या न कळत दररोजच्या जेवणात येणारे ताटातील हलाहल कमी होईल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s