व्रतस्थ ज्ञानयोगी : वामनराव अभ्यंकर –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/tribute-to-veteran-education-expert-vamanrao-abhyankar/articleshow/81120130.cms

शिक्षणाचा उपयोग देशासाठी व्हावा, या उद्देशाने हजारो विद्यार्थी घडविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वामनराव, तथा भाऊ अभ्यंकर यांच्या निधनाने एका व्रतस्थ जीवनयात्रेची सांगता झाली.

व्रतस्थ ज्ञानयोगी : वामनराव अभ्यंकर

शिक्षणाचा उपयोग देशासाठी व्हावा, या उद्देशाने हजारो विद्यार्थी घडविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वामनराव, तथा भाऊ अभ्यंकर यांच्या निधनाने एका व्रतस्थ जीवनयात्रेची सांगता झाली. कोकणातील नारिंग्रे गावी जन्मलेले अभ्यंकर यांची कर्मभूमी पुणे. नूतन मराठी विद्यालयात ते शिक्षक होते. शिक्षणातील नव्या प्रयोगासाठी झपाटलेले अप्पा पेंडसे यांनी त्यांना ‘ज्ञानप्रबोधिनी’त आणले. तिथे त्यांनी प्राचार्य आणि कार्यवाह म्हणून योगदान दिले. निगडी येथे प्रबोधिनीची शाळा उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षणाच्या नव्या वाटा चोखाळण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून घेतलेली प्रेरणा व अप्पा पेंडसे यांचा सहवास, ही त्यांची शिदोरी. केवळ शिकून वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळविण्यापेक्षा देशासाठी काय योगदान देणार, हा विचार त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजविला. त्यांची विद्यार्थिनी शालान्त परीक्षेतपुणे विभागात पहिली आली, तेव्हा शाळेला रोषणाई करावी, असा विचार पुढे आला; मात्र ‘आत्ता रोषणाई करू नका, या विद्यार्थ्यांनी देशाच्या वैभवात भर घातली, अशी स्थिती येईल, तेव्हा रोषणाई करू,’ असे मत अभ्यंकर मांडत असल्यानेच, त्यांचे विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळे ठरले. ‘आपला मुलगा फक्त पैसे मिळविणारा झाला, म्हणजे पालकांचे समाधान होते, त्याने काही विशेष काम करावे, अशी कल्पनाही पालक करीत नाहीत,’ अशी खंत व्यक्त करण्यावर न थांबता, त्यांनी विद्यार्थी-पालकांचे मन वळवून त्यांना नवा विचार दिला. मातृमंदिर संस्थेचे कार्यवाह म्हणून काम पाहतानाच पंचकोशाधारित गुरूकुलाचीही स्थापना त्यांनी केली. ‘नेतृत्वाचे पैलू’, ‘सस्नेह नमस्कार’, ‘एकविसाव्या शतकासाठी शिक्षण’,‘चिंतनिका’, ‘विद्याव्रत संस्कार-पंचकोश विकसनाचा संकल्प’, ‘शिक्षणाचे पंचाधार’ ही त्यांची ग्रंथसंपदा. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’देऊन गौरविले. ‘समाधानाने मरता येईल, असे जीवन जगा,’ असा संदेश देणारे अभ्यंकर यांच्या जीवनालाही अशीच कृतार्थतेची डूब होती. वामनराव अभ्यंकर यांना श्रद्धांजली!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s