टाटा समूहाचा किराणा व्यवसायातील प्रवेश निश्चित ; थेट ‘या’ कंपनीची केली खरेदी, ९५०० कोटींचे डील –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/tatas-to-buy-majority-stake-in-big-basket-clears-way-in-e-grocery/articleshow/81088591.cms

करोना संकटानंतर राहणीमान तसेच व्यवसायाच्या पद्धतीत देखील बदल झाला आहे. करोनापूर्वी केवळ फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शॉपिंगपुरता मर्यादित असलेल्या ई-कॉमर्स मंचावर मागील वर्षभरात किरणा मालाची प्रचंड विक्री झाली आहे. हीच बाब ओळखून टाटा समूहाने ऑनलाईन किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे.

हायलाइट्स:

  • ऑनलाईन किराणा व्यवसायात येण्याची संकेत यापूर्वीच टाटा समूहाने दिले होते.
  • टाटा समूहाने ऑनलाईन किराणा व्यवसायातील बिग बास्केट या कंपनीची खरेदी केली .
  • येत्या तीन ते चार आठवड्यात खरेदीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार

मुंबई : मागील सहा महिन्यांपासून ऑनलाईन किराणा व्यवसायात येण्यासाठी तयारी करणाऱ्या टाटा समूहाने मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाने ऑनलाईन किराणा व्यवसायातील ‘बिग बास्केट’ या कंपनीची थेट खरेदी केली आहे. बिग बास्केटमधील तब्बल ६८ टक्के हिस्सा टाटा समूहाने ९५०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या डीलनंतर टाटा समूहाचा किराणा व्यवसायातील प्रवेश सुकर झाला आहे.

‘लॉकडाउन’मध्ये दमदार कामगिरी; ‘या’ कंपनीचा केंद्र सरकारला तब्बल १६७ कोटींचा लाभांश
भारतात ऑनलाईन किराणा बाजारपेठ २०२० अखेर ३ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे रिलायन्स , टाटा सारखे बडे उद्योग समूह या क्षेत्राकडे आकर्षित झाले आहेत. टाटा समूहाने बिग बास्केटमधील ६८ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. हा व्यवहार ९३०० कोटी ते ९५०० कोटींच्या दरम्यान झाला आहे. बिग बास्केटचे एकूण बाजार मूल्य १३५०० कोटींच्या आसपास आहे. हा प्रस्ताव सध्या स्पर्धा आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. येत्या तीन ते चार आठवड्यात खरेदीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बिग बास्केटचे सह संस्थापक हरी मेनन संचालक मंडळावर कायम राहतील, असे सूत्रांनी म्हटलं आहे.

सोने सावरले; मात्र अजूनही १० हजार रुपयांनी आहे स्वस्त!ऑनलाईन किराणा व्यवसायात येण्याची संकेत यापूर्वीच टाटा समूहाने दिले होते. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी
टाटा समूह एक सुपर अॅप विकसित करत असल्याचे म्हटलं होते. टाटा सन्स आपल्या सुपर अॅपसाठी तोडीचा भागिदाराचा शोध टाटा समूहाकडून घेतला जात होता. टाटा या सुपर अॅपच्या माध्यमातून फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, किराणा, विमा, वित्तीय सेवा यांसारखे व्यवसाय एकाच छताखाली आणण्याची टाटा समूहाची योजना आहे. या सुपर अॅपमध्ये डिजिटल कंटेंट आणि शैक्षणिक कंटेंटही उपलब्ध असेल, असेही बोलले जाते.

अंबानी आणि टाटा आमने-सामने
मुकेश अंबानी आणि टाटा समूह आपापल्या पद्धतीने व्यवसाय धोरण आखत आहेत. मुकेश अंबानी यांना जिओच्या ४० कोटी ग्राहकांचा फायदा होईल. टाटा समुहाचे १०० पेक्षा जास्त प्रकारचे व्यवसाय आहेत.मीठापासून अनिशान मोटारीपर्यंत टाटा समूहाचा विस्तार आहे. प्रत्येक प्रकारच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी असणं ही टाटांसाठी जमेची बाजू आहे. टाटाची साखळी मोठी आहे. त्यामुळे आपले सर्व व्यवसाय एकाच ठिकाणी विक्री करू शकतील असं पोर्टल टाटाने विकसित केल्यास त्याचा आवाका मोठ्या प्रमाणात वाढेल.

ऑनलाईन किराणामध्ये ग्राहकांवर बरसणार सवलती
लॉकडाउननंतर झपाट्याने वाढलेल्या ऑनलाईन किराणा व्यवसायातील स्पर्धा आता आणखी तीव्र होणार आहे. यापूर्वीच ऑनलाईन किराणा व्यवसायात रिलायन्स जिओ मार्ट, अमेझॉन , फ्लिपकार्ट, उडान या सारख्या कंपन्या असून त्यात आता टाटा समूह देखील उतरणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात ऑनलाईन किराणामध्ये तगडी स्पर्धा होणार असून ग्राहकांवर मात्र नवनव्या ऑफर्सचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s