संतचरण लागता सहज… –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/sagun-nirgun/sagun-nirgun-by-dr-suniti-sahastrabuddhe-sant-tukaram-gatha-and-his-gatha/articleshow/80778156.cms

‘श्रवणे घडे चित्तशुद्धी.’ श्रवण केल्याने चित्त शुद्ध होते. शुद्ध होते, म्हणजे स्वच्छ होते. मनुष्याला चित्तामध्ये नको असलेली साठवण ठेवण्याची खूप सवय असते. काय असते ही साठवण? तर वासना, षड्‌रिपू आणि अहंकार या त्या गोष्टी.

डॉ. सुनीती सहस्रबुद्धे

‘श्रवणे घडे चित्तशुद्धी.’ श्रवण केल्याने चित्त शुद्ध होते. शुद्ध होते, म्हणजे स्वच्छ होते. मनुष्याला चित्तामध्ये नको असलेली साठवण ठेवण्याची खूप सवय असते. काय असते ही साठवण? तर वासना, षड्‌रिपू आणि अहंकार या त्या गोष्टी. यांना बाहेर काढून टाकायचे. चित्त स्वच्छ करायचे, रिकामे करायचे.
यातील पहिली वासना. वासना म्हणजे इच्छा, आसक्ती होय. जीवाला नाशिवंत विषयाची चटक लागल्याने, तो त्याच्याजवळ असलेले स्वस्वरूपाचे ज्ञान विसरतो. सत्त्व, रज, तम या तीन गुणांमुळे जीव पुढील जन्मासाठी बांधला जातो. म्हणजेच, वासना हे जन्माचे बीज. प्रत्येक मनुष्याला वासना ही असतेच; पण ती कुठे वळवायची, यावर सगळे अवलंबून असते. ती परमेश्वराकडे वळवायची, की षड्‌रिपूंकडे, अहंकाराकडे वळवायची, हे आपण ठरवायचे. जर कळत नसेल, तर संतांना शरण जायचे. समर्थांनी सांगितलेच आहे, ‘मना वासना वासुदेवी वसो दे।’ (मनाचे श्लोक १२८)तुकाराम महाराज म्हणतात, ‘संतचरण लागतां सहज। वासनेचे बीज जळोनि जाय।’ वासना पवित्र करायची.

गोंदवलेकर महाराज या वासनेविषयी छान सांगतात. ते म्हणतात, ‘प्रत्येकाच्या ठिकाणी वासना असतेच; पण ती कुठे वळते याला महत्त्व आहे. मला इच्छा असू दे; पण ती परमेश्वराचे चिंतन करण्याची असू दे. मला राग येऊ दे; पण कशाचा? तर मला अजून भगवंत भेटत नाही, त्या अर्थी मी कुठे तरी उणा पडत आहे, याचा. परमेश्वरभेटीची ओढ लागली, की क्रोधाचे रूपांतर लोभात होईल. सतत परमेश्वराचे चिंतन व नामस्मरण करीत राहणे, हा मोह. अशा तऱ्हेने सर्व वासना परमेश्वराकडे वळविल्या, की जे साध्य करायचे आहे, ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मस्वरूपदर्शन, ते लांब नाही.’ अशा तऱ्हेने वासना नष्ट करायची, म्हणजे ती परमेश्वराच्या ठिकाणी ठेवायची; त्यामुळे इतर वासनांची दारे आपोआप बंद होतील. संत मंडळी किती सोपे समजावून सांगतात नाही का?

चित्तात बसलेली दुसरी गोष्ट म्हणजे षड्‌रिपू. त्यांना जिंकणे हे महाकठीण काम; कारण ते आपल्या अंतरंगात ठाण मांडून बसलेले असतात. हे सहा शत्रू आहेत तरी कोण? १. काम – कोणत्याही वस्तूची अथवा गोष्टीची अभिलाषा असणे, इच्छा असणे. २. क्रोध – एखादी गोष्ट मनाजोगी झाली नाही, की चित्ताचा क्षोभ होणे. ३. मद – उन्मत्तपणा अथवा गर्विष्ठपणा. ४. मत्सर – दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे; तसेच द्वेष, हेवा, स्पर्धा. ५. दंभ – डौल, नुसता मोठेपणा, ढोंग आणि देखावा. ६. प्रपंच. समर्थांनी शेवटच्या दोन रिपूंत थोडा बदल करून, लोभ ऐवजी दंभ आणि मोह ऐवजी प्रपंच हे दोन रिपू सांगितले आहेत. का, ते पुढच्या आठवड्यात.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s