कर्जे महागणार ; पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने घेतला ‘हा’ निर्णय–महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/interest-rate-may-hike-as-rbi-decide-to-rise-crr/articleshow/80702242.cms

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची ३ फेब्रुवारीपासून बैठक सुरु होती. अर्थसंकल्पानंतर रिझर्व्ह बँक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही मात्र सीआरआर वाढवण्याची घोषणा केली.

हायलाइट्स:

  • रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण कर्जदारांना झटका
  • ‘आरबीआय’ने सीआरआर वाढवला
  • बँकांकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता

मुंबई : बजेटमध्ये करदात्यांचा भ्रमनिरास झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण कर्जदारांना झटका बसण्याची शक्यता आहे. आज शुक्रवारी जाहीर झालेल्या पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिर ठेण्यात आले असले तरी बँकेने घेतलेले एक निर्णय कर्जदारांसाठी अडचणीचा ठरणार आहे. यामुळं कर्जाचा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.

आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर जैसे थे ठेवला आहे. मात्र रोख राखीव प्रमाणामध्ये Cash Reserve Ratio (CRR) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने बँकांकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांसाठी सीआरआर ३ टक्क्यांवरून ४ टक्के करण्यात येईल, अशी घोषणा शक्तिकांत दास यांनी आज केली.
cue
दोन टप्प्यात सीआरआर वाढवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २७ मार्च २०२१ पर्यंत पासून तो ३.५ टक्के केला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात २२ मे २०२१ पासून तो ४ टक्के केला जाईल, असे आरबीआयने म्हटलं आहे.

BSNLआणि MTNL बंद करणार ; केंद्र सरकारने लोकसभेत दिले ‘हे’ उत्तर
दरम्यान, सीआरआर वाढल्याने बँकांच्या व्याजदरावरील दबाव वाढणार आहे. यामुळे बँकाकडून ठेवीदर आणि कर्जदार वाढवले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार असला तरी नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शैक्षणिक कर्ज यासारखी विविध कर्जे जादा व्याजदराने घ्यावी लागतील.

तब्बल सात वर्षांनंतर आरबीआयने रोख राखीव प्रमाणात बदल केला आहे. फेब्रुवारी २०१३ ते जानेवारी २०२० या काळात रोख राखीव प्रमाण ४ टक्के होते.लॉकडाउनमध्ये बँकांमधील मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाली होती. तर करोना पूर्व काळात सीआरआर ४ टक्के होता तर भारतीय स्टेट बँकेचा व्याजदर ६ टक्के होता जो मे २०२० मध्ये ५.४ टक्के इतका कमी झाला.

दरम्यान, तात्काळ व्याजदर वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण करोना काळात बँकामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झालेली नाही. त्याचबरोबर पुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकारने कर्ज घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बँकिंग यंत्रणेत ८ लाख कोटी येतील. तसेच बँकांना केंद्र सरकारकडून भांडवली मदत मिळणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s