सोज्ज्वळ व कणखर : निर्मला सीतारामन –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/finance-minister-nirmala-sitharamans-third-union-budget-2021/articleshow/80641359.cms

भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यांच्या सोज्ज्वळ, विनम्र, अभ्यासू; पण कणखर अशा प्रतिमेची चर्चा सुरू झाली.

भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यांच्या सोज्ज्वळ, विनम्र, अभ्यासू; पण कणखर अशा प्रतिमेची चर्चा सुरू झाली. कायम साडी या पारंपरिक पोशाखात राहिल्याने, भारतीय महिलांचे अस्सल प्रतिनिधित्व करताना त्या दिसतात. देशाचा अर्थकारभार सांभाळताना अनेक कटू निर्णय घ्यावे लागत असले, तरी त्यातून त्यांची कर्तव्याप्रतीची बांधिलकी स्पष्ट होते. पहिलाच अर्थसंकल्प सादर करताना पारंपरिक कातडी सुटकेसऐवजी, लाल रंगाच्या कापडात दस्तावेज आणून, ब्रिटिश गुलामगिरीची परंपरा झुगारत भारतीयत्वाचा नारा त्यांनी दिला होता. लोणचे घालतानाचा त्यांचा व्हिडिओ मध्यंतरी पसरला, तेव्हा त्यांच्यातील शालीनता, परंपराप्रियता व कार्यकुशलतेचा परिचय झालाच; परंतु अर्थमंत्रिपदावरील महिलाही किती सहजपणे सामान्य आयुष्य जगू शकते, हे दिसले. वास्तविक आज सर्वांत शक्तिशाली मंत्र्यांपैकी एक, अशी ख्याती असलेल्या निर्मला यांचा गतवर्षी जगभरातील सर्वाधिक प्रभावी शंभर महिलांच्या ‘फोर्ब्स’ यादीतही समावेश झाला, तो याच गुणविशेषामुळे. एके काळी शिकताना लंडनच्या रस्त्यांवर सेल्सगर्ल म्हणून काम केलेली मुलगी भारतासारख्या खंडप्राय देशाची कर्तृत्ववानअर्थमंत्री होते, यासारखे महिला सशक्तीकरणाचे दुसरे उदाहरण नसावे. त्यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळात पुलवामा घडले, तेव्हा बालाकोट येथे केलेले ‘सर्जिकल स्ट्राइक’ ही त्यांच्या रणचंडिका अवताराची प्रचीती होती. तमिळनाडून जन्मलेल्या व अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या निर्मला यांनी बहुचर्च ित जेएनयूमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. सहाध्यायी परकला प्रभाकर यांच्याशी तेथे जुळलेले बंध नंतर आयुष्याची साथ बनून गेले. लंडनमध्ये विविध कामे करता करता त्यांनी बीबीसीमध्येही उमेदवारी केली. सासरे काँग्रेसचे माजी मंत्री, तर सासूबाई आमदार अशा घरगुती वातावरणातही त्यांनी २००८मध्ये भारतीय जनता पक्षात सक्रिय होण्याचे धाडस केले. तत्पूर्वी, हैदराबाद येथे प्रणव स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उत्तम मुशाफिरी केली. महिला आयोग सदस्य, भाजपच्या प्रवक्त्या, राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री अशी दशकभराची चढत्या भाजणीची; परंतु अत्यंत वेगवान अशी त्यांची कारकीर्द महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s