कॉपी करताना सापडल्यास फेरपरीक्षाच!; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय – -महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/re-exam-if-found-while-copying-important-decision-of-the-high-court/articleshow/80635822.cms

Mumbai High Court: कॉपी करताना पकडल्या गेलेल्या एका बारावीच्या विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून मंडळाने दिलेला निर्णय कोर्टाने योग्य ठरवला आहे.

हायलाइट्स:

  • बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरणात हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
  • फेरपरीक्षेचा मंडळाचा निर्णय कोर्टाने ठरवला योग्य.
  • परीक्षार्थी विद्यार्थिनीचा दावा कोर्टाने केला अमान्य.

नागपूर: बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या एका विद्यार्थिनीला पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाने दिले होते. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे व राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. (Nagpur Bench Order On HSC Exam Copy Case )

वाचा: पुणे जिल्ह्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायती प्रशासकांच्या हाती; कारण…

वृषाली नितीन रघटाटे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती पूलगाव येथील आर. के. कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. २६ फेब्रुवारी २०२० रोजी वृषाली ही बारावी रसायनशास्त्राचा विषयाचा पेपरमध्ये कॉपी करीत होती. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने तिला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मंडळाने तिचा पेपर परत घेतला होता. त्यानंतर तिला बारावीची फेरपरीक्षा देण्याचे आदेश दिले. त्या आदेशाविरुद्ध तिने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

वाचा: अर्थसंकल्प: भाजपच्या राजकारणावर मुख्यमंत्री ठाकरेंनी हाणला ‘हा’ टोला

वृषालीने कोर्टात बाजू मांडताना मंडळाच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. भरारी पथक आले त्या दिवशी परीक्षा केंद्रातील इतर मुले भीतीने एकमेकांकडे चिटोरे फेकेत होते. एक चिटोरा तिच्या पायावर फेकण्यात आला असता तिने भीतीने तो उचलून खिडकीतून फेकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भरारी पथकाने तिला पकडले व तिचा पेपर हिसकावून घेतला. त्यानंतर आपल्याला म्हणणे मांडण्याची पुरेपूर संधी न देता आपला निकाल रोखून पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश दिले गेले. हा आदेश अन्यायकारक असून तो रद्द करण्यात यावा व आपला निकाल जाहीर करण्याची विनंती तिच्यावतीने करण्यात आली होती. दरम्यान, सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने मंडळाचा निर्णय योग्य ठरवून तिची याचिका फेटाळली. मंडळातर्फे अॅड. ओंकार देशपांडे आणि याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एन. एस. वाळूरकर यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s