अलीबाबा समुहाचे संस्थापक जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता? | महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/founder-of-alibaba-jack-ma-suspected-missing/articleshow/80090509.cms

चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यापासून अलीबाबाचे संस्थापक जॅक मा कुठेही दिसलेले नाहीत. ते बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. करोनाच्या काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या हुकूमशाहीचा जगाला पुन्हा एकदा अनुभव येतोय.

बीजिंग : चीनचे अब्जाधीश आणि अलीबाबा समुहाचे संस्थापक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून कुठेही दिसलेले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ‘आफ्रिका बिझनेस हिरोज’ या त्यांच्या स्वतःच्याच टॅलेंट शोमध्येही ते उपस्थित न राहिल्याने हा संशय अधिकच बळावला आहे.

जॅक मा हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते. पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या फेरीत त्यांच्या जागी अलीबाबा समुहाच्या कार्यकारी अधिकाऱ्याने हजेरी लावली, असं यूके टेलिग्राफचं म्हणणं आहे. त्यांचा फोटोही वेबसाइटवरुन काढून टाकण्यात आला आहे. वेळेअभावी जॅक मा यांना सहभाग घेता आला नाही असं अलीबाबा समुहाच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं.


जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये वादग्रस्त भाषण देत चीनच्या नियामक प्रणालीवर टीका केली होती. बँकिंग व्यवस्थेचाही त्यांनी समाचार घेतला होता. या भाषणापासूनच त्यांचं उद्योग साम्राज्य चीन सरकारच्या निशाण्यावर आहे.

आजची वित्तीय व्यवस्था ही अत्यंत जुन्या उद्योगावर आधारित आहे. नव्या पिढीसाठी यात निश्चितच बदल केले पाहिजेत, असं जॅक मा म्हणाले होते. जॅक मा यांचा उद्योक अँट आयपीओला चीनच्या प्राधिकरणाकडून हिरवा कंदील मिळाला होता. पण या भाषणानंतर काही आठवड्यातच त्याचा परवाना रद्द करण्यात आला. अँटमध्ये विविध त्रुटी असल्याचा ठपका शांघाय स्टॉक एक्स्चेंजने ठेवला होता.

दरम्यान, वित्तीय संस्था वाढू नयेत यासाठी हा परवाना रद्द केल्याचा आरोप अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार मार्क मोबियस यांनी केला होता. चीनमधील यंत्रणांनी डिसेंबरपासून अलीबाबा समुहामध्ये अँटी मोनोपॉली शोध सुरू केला असून अँट समुहाला आपल्या कामकाजात सुधारणा सुचवल्या आहेत.

जॅक मा यांनी करोनासाठी मदत म्हणून युरोप, अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेला लाखो मास्क पुरवले आहेत. जॅक मा यांचा समाजसेवेतही नेहमी पुढाकार असतो. जॅक मा फाऊंडेशनकडून ही कामे केली जातात. शिक्षण, व्यवसाय, महिला नेतृत्त्व आणि पर्यावरण या क्षेत्रात जॅक मा समाजसेवा करतात. जॅक मा यांनी अखेरचं ट्वीट गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी केलं होतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s