अर्थव्यवस्था रुळावर ; डिसेंबरमध्ये जीएसटीमधून सरकारला आतापर्यंतचे विक्रमी उत्पन्न –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/december-gst-revenue-at-record-level/articleshow/80061914.cms

यापूर्वी सर्वाधिक जीएसटी संकलन एप्रिल २०१९ मध्ये जीएसटीमधून १, १३, ८६६ कोटी रुपये कर महसूल मिळाला होता. मात्र डिसेंबरमध्ये त्याहून अधिक म्हणजे १.१५ लाख कोटी इतके कर उत्पन्न मिळाले.

नवी दिल्ली : सरत्या वर्षातील अखेरचा महिना केंद्र सरकारसाठी आर्थिक आघाडीवर शुभसंकेत देणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये वस्तू आणि सेवा करातून सरकारला १,१५,१७४ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात करोनाचे संकट असून देखील आतापर्यंतची एका महिन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

आरोग्य विम्याचे नुतनीकरण करताय; हे अतिरिक्त लाभ घेण्याचा विचार करा
केंद्र सरकारने आज जीएसटी कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली. ज्यात डिसेंबर महिन्यात संकलित केलेला एकूण जीएसटी महसूल १, १५, १७४ कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी २१, ३६५ कोटी रुपये आहे, एसजीएसटी २७,८०४ कोटी रुपये आणि आयजीएसटी ५७,४२६ कोटी रुपये संकलीत झाले आहेत. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत नोव्हेंबर महिन्यात दाखल झालेल्या जीएसटीआर -3 बी विवरणपत्रांची एकूण संख्या ८७ लाख आहे.

‘मुदतवाढ म्हणजे क्रूर चेष्टा’; ‘ITR’ मुदतवाढीवरुन सनदी लेखापाल संतप्त
सरकारने नियमित तडजोड म्हणून आयजीएसटीमधून २३,२७६ कोटी रुपये सीजीएसटीला आणि १७,६८१ कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. डिसेंबर महिन्यात नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी ४४,६४१ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ४५,४८५ कोटी रुपये आहे.

सराफा बाजार वधारला ; सोने-चांदीची नव्या वर्षात तेजीने सुरुवात,
जीएसटी महसुलात सुधारणेचा अलिकडचा कल पाहता, डिसेंबर महिन्यातील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूलपेक्षा १२ टक्के अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल २७ टक्के जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल ८ टक्के जास्त होता,जीएसटी लागू झाल्यापासून डिसेंबर २०२० मधील जीएसटीचा महसूल सर्वाधिक आहे. प्रथमच जीएसटी संकलनाने १.१५ लाख कोटींचा आकडा पार केला आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटीमधून १,०४,९६३ कोटींचा महसूल मिळाला होता. गेल्या २१ महिन्यांतील मासिक महसुलातली ही सर्वाधिक वाढ आहे. महामारीनंतर वेगवान आर्थिक भरारी आणि जीएसटी चुकवणाऱ्यांविरोधात देशव्यापी मोहिमेचा एकत्रित परिणाम यामुळे करपालन सुधारले आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s