पंडित दीनदयाल उपाध्याय : देशविकासाचे खरे नायक –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/article/jagdish-suklikar-article-on-great-thinker-pandit-dindayal-upadhya/articleshow/79991727.cms

पंडित दीनदयाल उपाध्याय हे थोर विचारवंत व चिंतक होते. देश विकासाच्या अनेक मुद्यांवर त्यांनी चिंतन केले. विचार मांडले. त्यांची विचारसरणी पुढे नेत देशाचा विकास करण्याच्या उद्देशाने दिल्लीला १९६८मध्ये दीनदयाल स्मारक समितीची स्थापना झाली.

जगदीश सुकळीकर

पंडित दीनदयाल उपाध्याय हे थोर विचारवंत व चिंतक होते. देश विकासाच्या अनेक मुद्यांवर त्यांनी चिंतन केले. विचार मांडले. त्यांची विचारसरणी पुढे नेत देशाचा विकास करण्याच्या उद्देशाने दिल्लीला १९६८मध्ये दीनदयाल स्मारक समितीची स्थापना झाली. अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी तर सचिव नानाजी देशमुख होते. नानाजींनी १९७८मध्ये राजकीय जीवन संपवून समाजकार्यात उडी घेतली. दीनदयाल स्मारक समितीची पुनर्स्थापना केली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्मता मानवतावादाला जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांतीची जोड देऊन दीनदयाल स्मारक समितीचे ‘दीनदयाल शोध संस्थान’मध्ये परिवर्तन करण्यात आले. देशाच्या ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक सुधारणेची पायाभरणी करण्यात आली.

खेड्यात जाऊन तेथील परिस्थितीचे अवलोकन करून तिथल्या लोकांच्या अडचणी समजून आपल्या कार्याची दिशा ठरवण्याकरिता नानाजींनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील जयप्रभाग्राम हे गाव निवडले. आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. हे गाव नेपाळ सरहद्दीजवळ आहे. तेथील जनता अतिशय गरीब असून जवळच थारू नावाचे आदिवासी क्षेत्र आहे. या जमातीचे लोक हे राणा प्रतापांचे वंशज आहेत. ११ फेब्रुवारी १९७८ रोजी दीनदयाल शोध संस्थानचा पहिला प्रकल्प जयप्रभाग्राम येथे तत्कालीन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांचे हस्ते उद्घाटित झाला. गोपाल अगरवाल, सुरेश देशपांडे, गणेश पाठक, ज्योती मुजुमदार, मालवीय असे धडाडीचे युवा कार्यकर्ते कामाला लागले. कोणतेही काम सुरू करायचे असल्यास त्यांना कार्यकर्ते लागतातच. नानाजींनी भारतीय जनता पक्षातील एकही कार्यकर्ता न हालवता नवीन कार्यकर्त्यांची चमू उभी केली. डॉ. जैन, मलकानी, डॉ. महेश शर्मा आदी अनेक कार्यकर्ते जुळले. अकरा युवा दाम्पत्यांची टीम कामाला लागली. त्यांना ‘समाज शिल्पी’ म्हणायचे.

शेतीसाठी पाणी गरजेचे होते. नानाजींनी गोंडा परिसरात बोअरवेल खणण्याचे ठरवले. त्यांनी विकसित केलेले बोअरवेलचे तंत्र अतिशय स्वस्त आहे. त्यात पाइपऐवजी बांबू वापरण्यात येतो. या जिल्ह्यामध्ये ४० हजारावर बोअरवेल खणून तो भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ केला आहे. या भागात गरिबी व अशिक्षितता असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप होते. लोकांजवळ औषध घेण्यास पैसे नव्हते. दीनदयाल शोध संस्थानने ‘दादी माँ का बटवा’ तयार केला. खेड्या-खेड्यात वाटला. आयुर्वेद दवाखाना उघडून लोकांची तपासणीही सुरू केली. शेतकऱ्याची उपजीविका केवळ शेतमालाच्या उत्पन्नावर होत नाही. नानाजींनी मधमाशी पालन, कुक्कुटपालन, डुक्करपालन यासारखे उद्योग प्रकल्प काढून ते यशस्वी करून दाखवले.

समाजाचे अर्थिक उत्पन्न वाढवण्याबरोबरच स्थानिक युवकांच्या बुद्धिमत्तेला वाव देऊ लागले. जयप्रभाग्राममधील नॉनमॅट्रिक कन्हैयालालने ५२ लिटर प्रतिमिनिट आउटपुट असलेला पंप शोधला. बैलाने चालवला जाणारा हा पंप नागपूरचे उद्योगपती पडगीलवार यांनी गोंडा भेटीत पाहिला. कन्हैयालालला व त्या पंपाला घेऊन ते नागपुरात आले. त्यात थोड्या सुधारणा करून परत पाठविला. आज तो ‘दीनदयाल पंप’ म्हणून प्रसिद्ध आहे. केवळ आठवी पास असलेल्या स्थानिक निवासी हरिरामने आपल्या बुद्धिमत्तेने पायाने चालवता येणारे तागापासून सुतळी बनवण्याचे यंत्र तयार केले. मशिन घरीच असल्यामुळे घरातील सर्व सदस्य वेळ मिळेल तेव्हा सुतळी तयार करू लागले. त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्नही वाढले. असे अनेक प्रयोग करून नानाजींनी ग्राम विकासाचा पहिला प्रयोग जयप्रभाग्राम येथे यशस्वी करून दाखवला. थारू क्षेत्रातही त्यांनी शाळा व वसतिगृह काढून शैक्षणिक पाया भरला.

गोंडा येथे जसे ग्रामविकास प्रकल्पाचे मॉडेल केले, तसेच नागपूर येथे बालजगत आणि रचनाप्रकल्प, चित्रकूट येथे ग्रामीण विश्वविद्यालय प्रकल्प, बीड येथे ग्रामीण रोजगार प्रकल्प सुरू करून नानाजींनी ग्रामीण विकासाची वाटचाल सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी ते स्वत: जाऊन संकल्पना तयार करीत. कार्यकर्त्यांची टीम तयार करून त्याच्यावर प्रकल्प सोपवून ते पुढील प्रकल्प उभारणीस लागत. नानाजींच्या चित्रकूट येथील प्रकल्पामध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे दोन दिवस राहिले होते. तेथील काम पाहून भारावून गेले. तेथून मुंबईला गेले. तेथे आयाोजित फिल्म फेअर पुरस्कार वितरण समारंभातील भाषणात ते म्हणाले होते, ‘आज मी पाहतो आहे की चित्रपटसृष्टीतील सर्व नायक माझ्या समोर बसले आहे, पण माझे खरे नायक नानाजी देशमुखांबरोबर चित्रकूटला देश विकासाचे काम करीत आहेत.’

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s