प्रेरणादायक : धरमपाल गुलाटी – महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/tribute-to-mdh-masala-owner-mahashay-dharampal-gulati/articleshow/79557034.cmsVishal Gangurde | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 04 Dec 2020, 06:00:00 AM

एमडीएच या प्रख्यात मसाला ब्रँडचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांच्या निधनाने एक प्रेरणादायी आयुष्य संपले. उराशी फाळणीचे दुःख आणि हातात अवघे दीड हजार रुपये घेऊन सियालकोटहून भारतात आलेले धरमपाल यांनी मसाल्यांच्या मार्गाने जाण्यापूर्वी अनेक कामे करून पाहिली.

एमडीएच या प्रख्यात मसाला ब्रँडचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांच्या निधनाने एक प्रेरणादायी आयुष्य संपले. उराशी फाळणीचे दुःख आणि हातात अवघे दीड हजार रुपये घेऊन सियालकोटहून भारतात आलेले धरमपाल यांनी मसाल्यांच्या मार्गाने जाण्यापूर्वी अनेक कामे करून पाहिली. दिल्लीत टांगाही चालवला. एके दिवशी टांगा विकून वडिलांच्या मसाला व्यवसायाला त्यांनी दिल्लीत करोलबाग येथे सुरुवात केली. कुटलेले मसाले विकण्यास सुरुवात केल्यावर हळूहळू त्यांचा जम बसू लागला. लवकरच त्यांना तयार मसाल्यांची संकल्पना सुचली. त्यावेळी ही कल्पना नवीन होती. आज सुमारे एक हजार कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग पंधरा कारखान्यांतून देशातच नव्हे, तर परदेशातही माल पोहोचता करतो. व्यावसायिक यशाच्या मुळाशी तीन तत्त्वे त्यांनी पाळली, सचोटी, गुणवत्ता आणि किफायतशीरपणा. पहाटे साडेचारला उठून व्यायाम करण्याची शिस्त असलेले धरमपाल, वयाच्या ९८व्या वर्षीदेखील तंदुरुस्त होते. आधुनिक काळातील टीव्हीवरील जाहिरातीमध्ये त्यांनी सेलिब्रेटीचा चेहरा आणण्याऐवजी, आपला चेहराच ब्रँड म्हणून वापरला. ते कमालीचे यशस्वी ब्रँड अँबेसेडर ठरले. त्यांच्या या सशक्त, सुसंस्कृत चेहऱ्यामागे सेवाभावी कार्याचाही आधार होता. गृहोपयोगी वस्तू क्षेत्रातील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ अशी त्यांची ख्याती होती; मात्र आपले नव्वद टक्के वेतन ते दान करत. गरीब वसाहतींमध्ये चार शाळा आणि दिल्लीत अडीचशे खाटांचे रुग्णालयही चालवत. आपल्या प्रतिकूलतेला बलशाली बनवत, सचोटी, साधेपणा आणि शुद्धता या मूलभूत गुणांना तेज बहाल करणारे ते अस्सल प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s