‘करोना’मुळे पोल्ट्री उद्योगाला २ हजार कोटींचा फटका –महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : करोना विषाणूने चीनसह भल्याभल्या देशांना घाम फोडला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री उद्योगाला बसला आहे. करोनाची लागण होण्याच्या संशयावरून चीनमधील लाखो कोंबड्या नष्ट केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतातील पोल्ट्री उद्योग संकटात सापडला आहे. याचा मोठा फटका आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योजकांना बसला आहे. करोनामुळे आतापर्यंत पोल्ट्री उद्योगाचे २००० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या उद्योगातील कामगारांवर आता बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.

‘करोना’; ‘गोल्ड ईटीएफ’ मध्ये विक्रमी गुंतवणूक

चीनमधील लाखो कोंबड्या नष्ट केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्राहकांनी चिकन खाणे बंद केले आहे. यामुळे बाजारात चिकनचे भाव कोसळले आहेत. करोनाच्या भीतीने काही उद्योजकांनी शेकडो कोंबड्या फुकट वाटल्या आहेत. तर काहींनी हजारो कोंबड्या नष्ट केल्या आहेत. यामुळे या उद्योगाचे दररोज प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने या उद्योगाला वाचवण्यासाठी मदत करावी अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली यांनी केली आहे.

करोना: स्पेनमध्ये १२० वर्षांनी आणीबाणी जाहीर

पोल्ट्री उद्योगात जवळपास १० लाख शेतकरी आहेत. या उद्योगाचे जीडीपीमध्ये १.२ लाख कोटींचे योगदान आहे. मात्र करोनाने या उद्योगाची वाताहत झाली आहे. चिकनमध्ये करोनाचे विषाणू अशी शकतात, अशा अफवा मागील दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ज्यामुळे खबरदरीचा उपाय म्हणून ग्राहकांनी चिकनपासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. त्यामुळे देशभरात चिकनच्या विक्रीत मोठी घसरण झाली असून भाव २५ ते ३० टक्क्यांनी गडगडले आहेत. चिकन स्वस्त होत असले तरी मटणाचे भाव वाढले आहे.

करोनानंतर बर्ड फ्लू; कोंबड्यांची अंडी जाळणार

दरम्यान, आता केरळात बर्ड फ्लूची साथ आल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळमधील मलप्पुरममधील परप्पनगडी येथे बर्ड फ्लू आढळल्याने केरळ सरकार सतर्क झाले आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी केरळ सरकारने आता कोंबड्यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी २००६ मध्ये आलेल्या बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री उद्योगात संकटात सापडला होता.

via poultry industry faces huge loss : ‘करोना’मुळे पोल्ट्री उद्योगाला २ हजार कोटींचा फटका – poultry industry faces huge loss due to corona virus | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s