flat transfer in favor of nominee should be required | नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे फ्लॅट ट्रान्स्फर होणे गरजेचे – Maharashtra Times–05.07.2018–*****

१) आमची सहकारी हाऊसिंग सोसायटी २००१-२००२मध्ये रजिस्टर झाली आहे. एकूण ५ मजली एकच इमारत आहे व त्यामध्ये २६ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिकेचे सरासरी क्षेत्रफळ ६२५ ते ७०० चौरस फूट आहे. आमचा प्रश्न पुढीलप्रमाणे आहे. आमच्या सोसायटीतील एका सदनिकाधारकाचे (ओनर) ३-४ वर्षांपूर्वी निधन झाले. त्याने दिलेल्या नॉमिनेशन पत्राप्रमाणे आता त्या सदनिकेवर त्यांचा मुलगा व एक मुलगी (प्रत्येकी ५०%) यांचे नाव आहे. परंतु त्या दोघांमधील वाद संपलेला नाही. त्यामुळे अजून शेअर सर्टिफिकेट्सवरील नावे बदलण्यासंबंधी त्यांच्याकडून सोसायटीला काहीही विचारणा झालेली नाही. यासंबंधी सोसायटीकडून काय कारवाई अपेक्षित आहे? सोसायटीचे वार्षिक व मासिक वर्गणी देणेसंबंधी कोणास विचारणे जरूरी आहे. त्यांच्याकडून वर्षभराचे येणे बाकी आहे. याबाबत त्यांचे मुलाकडे वारंवार विचारणा केली, परंतु सदनिकेची मालकी कोणाकडे या संबंधीचा वाद अजून मिटलेला नाही असे सांगण्यात येते. तरी याबाबत सोसायटीने काय करावे?

तुम्ही कशाबद्दल गोंधळलेले आहात हे मला समजत नाही. मृत व्यक्तीने मुलगा आणि मुलीच्या नावे प्रत्येकी ५० टक्के शेअर दिलेले वैध नॉमिनेशन केलेले असेल तर सोसायटीला केवळ नामांकन असलेल्यांच्या नावे फ्लॅट ट्रान्स्फर करायला हवा. या दोन नामनिर्देशित व्यक्तिमधील वादात विनाकारण सोसायटी का लक्ष देत आहे? या वादाशी सोसायटीचा कसा काय संबंध पोहोचतो? कायद्याच्या तरतुदींनुसार हा फ्लॅट सोसायटीने नॉमिनेशननुसार फ्लॅट ट्रान्स्फर करायला हवा. महाराष्ट्र सहकारी संस्था १९६०च्या कलम ३०मध्ये हे स्पष्ट केले आहे की सोसायटीने नियमानुसार नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे दिवंगत सदस्याने सुपुर्द केलेले फ्लॅटचे शेअर किंवा लाभ हस्तांतर करायलाच हवेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६१च्या कलम २५मध्ये नमूद केलेले आहे की सदस्याला आपल्या मर्जीच्या व्यक्तीला नामनिर्देशित करायचा अधिकार आहे. वैध नामांकन असल्यास सोसायटीने अशा नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे ट्रान्स्फर करायला हवे, या संदर्भात कायद्याच्या दृष्टीने कोणतीही शंका नाही. एकदा का ते सदस्य झाले आणि त्यांची नावे शेअर सर्टिफिकेटवर आली की त्यांना अन्य सदस्यांप्रमाणे सोसायटीचे शुल्क देणे त्यांचे कर्तव्य असेल. त्यांनी ते भरले नाही तर कायद्यात त्यांच्यावर कारवाईचेही मार्ग सांगितलेले आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांना नामनिर्देशित सदस्य करून घ्यायला हवे.

२) ७६०० चौरस मीटर भूखंडावर १२५ फ्लॅट असलेली व एकापेक्षा जास्त रजिस्टर सोसायटीज असलेली आमची सोसायटी आहे. या जागेचे कन्व्हेअन्स डीड झालेले नाही. ते करण्यासाठी फेडरेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सोसायटी सोडून बाकी सर्व सोसायट्यांनी फेडरेशनसाठी प्रतिनिधी नेमले आहेत. प्रतिनिधी न दिलेल्या सोसायटीचे तीन-चार वर्षांचे‌ ऑडिट झालेले नाही. सोसायटीचे हिशेब ठेवले जात नाहीत. चेअरमन सेक्रेटरी नाहीत. शिवाय कोणताही सभासद कसलीही जबाबदारी घेणेस तयार नाही. अशा परिस्थितीत त्या सोसायटीतील एका सभासदाने सहकार खात्याकडे अर्ज केला तरी प्रशासक येऊ शकतो. प्रशासक आल्यास तो फेडरेशनचे अर्जावर सही करू शकेल का? बिल्डरला पैशाची अपेक्षा असल्याने सर्व फ्लॅटधारक पैसे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आम्ही डीम्ड कन्व्हेअन्स डीडसाठी प्रयत्न करीत आहोत.

सर्वांनी एकत्र येऊन फेडरेशन केल्यास बिल्डरला फेडरेशनच्या नावे कन्व्हेअन्स करणे शक्य होईल, या तुमच्या मताशी मी सहमत आहे. तथापि, एका सोसायटीचे गंभीर प्रश्न आहेत आणि त्याच्यात अत्यंत गैरव्यवस्थापन आहे. तात्पुरता उपाय म्हणून मर्यादित काळासाठी प्रशासक आणणे हे बरोबर आहे. अशा प्रशासकाला व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकार असतात आणि तो फेडरेशनमध्ये सोसायटीला आणण्यासाठीची पावले उचलू शकतो. तुम्ही ओनरशिप फ्लॅट्स अॅक्ट, १९६३मधील डीम्ड कन्व्हेअन्सच्या तरतुदींद्वारेही कन्व्हेअन्स करून घेण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु, त्यासाठी तुम्ही जी गैरव्यवस्थापन होत असलेली सोसायटी म्हणता त्या एका सोसायटीचीदेखील संमती लागेल. प्रशासक नेमला तर प्रश्न सुटेल. परंतु दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोसायटीने स्वत: व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे. कारण प्रशासक कायमस्वरूपी नेमला जाऊ शकत नाही.

via flat transfer in favor of nominee should be required | नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे फ्लॅट ट्रान्स्फर होणे गरजेचे – Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s