‘एफआरडीआय’ला विरोध सुरूच – महाराष्ट्र टाइम्स–०८.१२.२०१७

फायनान्शिअल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स’ (एफआरडीआय) विधेयकाला विरोध सुरू असून यासंदर्भातील ऑनलाइन याचिकेला हजारहून अधिक जणांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रस्तावित विधेयक ठेवीदारांसाठी अधिक सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाने दिल्यानंतरही विधेयकाला विरोध होत आहे.

‘एफआरडीआय’ विधेयकाविरोधात ‘चेंज डॉट ओआरजी’ या वेबसाइटवर ऑनलाइन याचिका असून सोशल मीडियावर ती व्हायरल झाली आहे. बँक दिवाळखोरीमध्ये निघाली, तर ठेवीदारांचे पैसे वापरण्याचे अधिकार सरकारला असल्याची तरतूद विधेयकामध्ये आहे, असा आरोप करून या विधेयकाला विरोध होत आहे. मुंबईस्थित शिल्पा श्री यांनी ही ऑनलाइन याचिका केली आहे. त्याला २४ तासांत ४० हजारांहून अधिक जणांनी ‘साइन-अप’ केले आहे. या विधेयकामधील ‘बेल-इन’ची तरतूद हटवावी, अशी विनंती अर्थमंत्री अरुण जेटली यांना यातून करण्यात आली आहे. शिल्पा यांनी म्हटले आहे, की ‘मुलांच्या आणि आमच्या भविष्यासाठी अत्यंत कष्टाने आम्ही पैसा मिळवलेला आहे. बँका दिवाळखोरीत निघाल्या, तर त्यासाठी तो वापरला जाईल.’

दरम्यान, अर्थमंत्रालयाने ‘एफआरडीआय’ विधेयक ठेवीदारांसाठी अधिक चांगले असून सध्या असणाऱ्या तरतुदींपेक्षा यात अधिक सुरक्षितता जपली गेली आहे. अनेक ठिकाणी सध्या ‘बेल-इन’ची तरतूद असून त्याकरिता (ठेवीदारांचे पैसे वापरण्याकरिता) ठेवीदारांच्या परवानगीची गरज भासत नाही.’ हे विधेयक ११ ऑगस्ट २०१७ रोजी लोकसभेमध्ये सादर केले गेले. संसदेच्या संयुक्त समितीमध्ये सध्या त्यावर विचार होत आहे.

एफआरडीआय विधेयक सध्या स्थायी समितीसमोर आहे. वित्तीय संस्था आणि ठेवीदारांचे पूर्ण संरक्षण हे या विधेयकामागील उद्दिष्ट आहे. सरकार त्याकरिता कटिबद्ध आहे.

– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

via frdi act|‘एफआरडीआय’ला विरोध सुरूच – business news in Marathi, Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s