मीडिएशन’मधून सुटले प्रश्न – महाराष्ट्र टाइम्स २६.११.२०१७

पुणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांकडून या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत ४ हजार ५३८ केस मीडिएशनसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यातील एक हजार ६३० केस निकाली काढण्यात यश आले आहे; तर ९ हजार ७६४ केस अद्याप प्रलंबित आहेत. कोर्टातील प्रलंबित केस लवकर निकाली निघाव्यात म्हणून हाय कोर्टाने राज्यातील प्रत्येक कोर्टाला महिन्याला किमान दोन केस मीडीएशनसाठी विधी प्राधिकरणाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रत्येक कोर्टाकडून दर महिन्याला तडजोडयोग्य असलेल्या दोन केस मीडिएशनसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे मीडीएशनसाठी येणाऱ्या केसची संख्या वाढली आहे.

मीडिएशनसाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील, प्रशिक्षण देण्यात आलेले मीडिएटर वकिलांची या केस निकाली काढण्यासाठी नियुक्ती करण्यात येते.

कोर्टात प्रलंबित असलेल्या तडजोडयोग्य केस निकाली काढण्यासाठी दोन्ही पक्षकारांमध्ये समझोता घडवून त्यांची केस मिटविण्याचा प्रयत्न मीडिएटरकडून केला जातो. कोर्टातील वाढत्या केसची संख्या, प्रलंबित केसची संख्या कमी करण्यासाठी न्याय यंत्रणेकडून मीडिएशन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतो आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे या वर्षी ऑक्टोबर अखरेपर्यंत ५,०५५ केस न्यायाधीशांकडून वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यातील एक हजार ६३० केसेस निकाली काढण्यात यश आले आहे. तर ३ हजार २७२ केस निकाली न काढण्यात आल्यामुळे पुन्हा कोर्टाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. तसेच एकूण ९ हजार ७६४ केस अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली.

मीडिएशनसाठी तडजोडयोग्य केसेस विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येतात. कौटुंबिक वादाच्या केस, घटस्फोट, पती आणि पत्नीमधील वाद, कायद्याने तडजोडयोग्य असलेल्या केस, विविध सेवासंदर्भातील बिलांच्या केस मीडिएशनसाठी वर्ग करण्यात येतात.

via mediation|‘मीडिएशन’मधून सुटले प्रश्न – pune news in Marathi, Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s